मुखवटे....
मुखवटे....
1 min
253
मुखवटे गळून पडल्यावर
दिसताे खरा चेहरा,
अनेकदा मुखवटे भाेळे
कधी करतात कावराबावरा...
मुखवटे देतात आजकाल
अनेक प्रश्नांची उत्तरे,
खर्या मुखवट्याखाली खाेटे
लावतात गाेंधळाचे नारे....
मुखवटे आले पाहिजे आेळखता
तेव्हाच सत्य येईल उजेडात,
आजकाल सवॆच मुखवटे
टाकतात सत्यालाच काेड्यात....
मुखवटे शत्रूच्या वेषात
करतात आपल्या माणसांशी मैत्री,
कधी कधी खाेट्यालाच
खरं समजून लावतात कात्री....
