STORYMIRROR

Anupama TawarRokade

Others

3  

Anupama TawarRokade

Others

मुग्धा श्र्वेतांबरी

मुग्धा श्र्वेतांबरी

1 min
155

थेंब थेंब झेलते 

पावसाच्या सरीचे

ओंजळीत मोहिनी

चातक रे प्रेमाचे


श्वेतांबर नेसून

हिरवळीत डोले

केशभार मोकळा

राज तिचे खोले


आसुसलेल्या मनी

गुज सरींचे खोले

शब्द येथे अपुर्ण

सौंदर्य राज बोले


स्वच्छंदी ही मोहीनी

स्वतः त गुंतलेली

बेभान पावसात

मुग्धा मंतरलेली


साहित्याला गुण द्या
लॉग इन