STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

मथुरेचा हा घाट ( गवळन)

मथुरेचा हा घाट ( गवळन)

1 min
410

चालून चालून पाय हे थकले

दुखतंय माझी पाठ...

गं बाई बाई. ...मथुरेचा हा घाट

मी चालू कशी मथुरेचा हा घाट॥धृ॥


पहाट वारा झोमतोय अंगा

दह्याचा भारी होतोय माठ

गं बाई बाई. ...मथुरेचा हा घाट

मी चालू कशी मथुरेचा हा घाट॥१॥


पाय लटपटे कंबर लचके

पदर उडतोय लांब

आली थंडीची ही लाट

गं बाई बाई...मथुरेचा हा घाट

मी चालू कशी...मथुरेचा हा घाट ॥२॥


गेल्या माझ्या सख्या समोर

दिसत नाही हा चंद्रचकोर

कान्हाची पाहूनी थकले वाट

गं बाई बाई...मथुरेचा हा घाट

मी चालू कशी...मथुरेचा हा घाट ॥३॥


मज उशीर होईल बाजारी

यायचे लवकर अपुल्या घरी

भरेल ना हा यमुनेचा पाट

गं बाई बाई...मथुरेचा हा घाट

मी चालू कशी...मथुरेचा हा घाट ॥४॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन