मतदान... एक राष्ट्रीय कर्तव्य
मतदान... एक राष्ट्रीय कर्तव्य
1 min
4.0K
मतदाता झालाय
जागरूक आता
योग्य उमेदवार
निवडायचा आहे आता
लोकशाहीच्या राज्यात
मतदानाचा हक्क
बजावू आता...
मतदान असे
राष्ट्रीय कर्तव्य
एका मताला असे
खूपच महत्व
लोकशाहीवर ठेवून विश्वास
मतदानाचा हक्क
बजावू आता...
आपलं एक मत घडवी
सामाजिक विकास
करुयात मतदार यादीतील
आपल्या नावाची खात्री
स्थिर सरकारसाठी
मतदानाचा हक्क
बजावू आता...
चला मतदान करुया
करुया आव्हान
सामान्य जनतेला
समजावून सांगू
मतदान प्रक्रिया
राष्ट्रीय कार्याला
हातभार लावू आता...
मतदानाचा हक्क
बजावू आता...
