Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anita Gujar

Others

3  

Anita Gujar

Others

मृगधारा

मृगधारा

1 min
432


नभ ढगाळलं सारं

वाहे गार गार वारा

सर्वा लागली चाहुल

बरसल्या मृगधारा||१||


झाली थेंबाची झिम्मड  

न्हाला पाण्यात आषाढ

शांत झाली धरतीची

तगमग अन् ओढ||२||


धुंद मृगाच्या स्पर्शानं

जागे झाले माळरान

हसे मातीच्या कुशीत

गोड उद्याचं सपान ||३||


उंच डोंगराची माळ

झाली न्हाऊन नितळ

वाहे दऱ्याखोऱ्यातून 

शुभ्र पाण्याचे ओहळ||४||


येता आभाळ दाटून

होते पावसाची वृष्टी

सुखकर धरा झाली

आनंदली सारी सृष्टी||५||


पावसाची सर येता

कोंब मातीतून येती

दाणा अंकुरण्यासाठी

प्रसवली ही धरती||६||


Rate this content
Log in