STORYMIRROR

Stifan Khawdiya

Others

3  

Stifan Khawdiya

Others

मृग नक्षत्र

मृग नक्षत्र

1 min
449

मृग नक्षत्र प्रारंभ 

आला पाऊस जोरात

गंध मातीचा मोहक

थेंब थेंब गारव्यात


काळे मेघ नभी आले

वीज शूभ्र कडाडली

थंड तुफानी वाऱ्यात

सर वरुणाची आली


आला पाऊस जोमात

झाली किमया क्षणात

नष्ट झाला कोरडावा 

जल जल हे मातीत


झाला पालट भूवर

ओलावा तिच्या गर्भात

जागो जागी अंकुरले 

कोवळ्या हिरवाईत


सुखावली वसुंधरा

वरुणाच्या आगमणी

कसा शमला उन्हाळा

हर्ष वाटे क्षणोक्षणी


आला वरुण वरुण

झालं चैतन्य निर्माण

थेंब वरूणाचे दवा

गेला दुष्काळ सरुण


वरूणाचे आगमन

गेला दुष्काळ सरुन

नदी,नाले,तळे,ओढे

वाहे दुथडी भरून


झाला पाऊस परीस

स्वप्न बळीचे सत्यात

मनी सुखाची रे आस

सोनं हिरवं शेतात


साहित्याला गुण द्या
लॉग इन