मराठी असे आमची मायबोली
मराठी असे आमची मायबोली
1 min
251
जन्मदिन कुसुमाग्रजांचा हा
गौरव दिन मराठुी
भाग्यवान जनी आपण
कारण बोलतो मराठी
लाभला वरदहस्त सरस्वतीमातेचा
ती माझी माय मराठी
व्याकरण,अलंकाराने नटली माझी माय मराठी
अभंग, काव्य,भारुडे यांतून
व्यक्त होते मराठी
निबंध, संवाद,वर्णनातून
मन मुक्त करते मराठी
संस्कृत,प्राकृताचे जन्मस्थान
लाभले ती मराठी
जगात नाही भाषा अशी
जशी माझी माय मराठी
बना शिलेदार मराठीचे
बाणा ठेवा मराठी
अमृताची गोडी जिच्यात
ती माझी माय मराठी
