Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

नासा येवतीकर

Others

4  

नासा येवतीकर

Others

मोठं मन

मोठं मन

1 min
270


इतरांना मोठं म्हणायला

खूप मोठं मन लागतं

इतरांना मदत करायला

पैश्याच्या श्रीमंतीची नाही

मनाच्या श्रीमंतीचं धन लागतं

नसते काहींच्या मनात

इतरांना मोठं म्हणायचं

ते नेहमी कुढत राहतात

आपल्याच छोट्या मनात

इतरांची केलेली वाहवा

यांच्या डोळ्यात सलते

आपली तारीफ केली की

दुश्मन भी मग गोड वाटते

अश्यांची होत नसते प्रगती

ते नेहमीच जळत असतात

आपल्याच कोशात नेहमी

स्वतःला गुरफटून बसतात

हळूहळू सारेच दूर होतात

कोणी राहत नाही जवळ

कळतात सारे गुण अवगुण

भाटच शिल्लक राहती निव्वळ

दुसऱ्यांच्या सुखात शोधा

आपलेही जरासे सुख

दुसऱ्याच्या दुःखात ठेवू वाटा

तेंव्हा समाधानी दिसे मुख


Rate this content
Log in