मोकळा श्वास..!
मोकळा श्वास..!
आठवते मज त्या वळणावर
बट तुझी उडली होती
त्याच क्षणी ग वेडे
माझी गाडी अडली होती...
नजरा नजर अलगद
सहजच झाली होती
नजरेत तुझ्या ग वेडे
छबी माझी मी पाहिली होती...
तू जशी घुसलीस काळजात
तसाच मी ही शिरलो तुझ्या हृदयात
अजूनही आहे तिथेच वेडे
गुरफटून तुझ्या अंतरात...
बघ हवे तर डोकावून
तुझ्याच तू पुन्हा एकदा हृदयात
असेन मी तिथेच बंदी
प्रेमळ तुझ्या काळजात...
बाहेर पडणे मज होत नाही
मी हतबल तू जाणतेस
कशास मग सांग मला
जा जा मज लटकेच म्हणतेस...
ओढ तुझी अनावर
खेचून ठेवते मज कैदेत
घसमटतो गुरफटतो
कासावीस होतो तुझ्या बंधनात...
विनवणी माझी ऐक वेडे
मिळतील अनेक मातब्बर
सोड बंध मुक्त कर मला
घायाळ मी नाही तूला खबर....
मोकळा श्वास घेण्यास मी आतुर
तू कोंडण्यात मोठी गे चतुर
नसे वल्गना ही थातूर मातूर
झाले बघ डोळे तुझे फितूर....!
