मोहमयी राधिका
मोहमयी राधिका
1 min
506
मोहमयी राधिका ती
क्रिष्णमयी भासते
प्रेममयी धून तिच्या
ह्रदयातच हासते
निस्वार्थी प्रेम ते
जेव्हा ह्रदयी अंकुरते
निःशब्द भावनेचे
गीत ओठी झंकारते
राधाकृष्ण नाव दोन
एक रूप जाहले
एकमेकात दोघांनी
प्रतिबिंब पाहले
बासरीच्या सूराने
मन तिचे वेडावले
रास खेळतांना तिचे
भाव हे नादावले
कुंजवनात प्रीतही
राधाकृष्णाची बहरली
क्रिष्णरुप राधिका मग
अंतरंगी मोहरली
शुध्द प्रेमाची प्रतिमा
राधिकेतच विरली
राधेकृष्ण बोलण्याची
मग रित जगाने धरली.....
