मोगर्याचा नजराणा
मोगर्याचा नजराणा
1 min
393
तुझ्यावर खेळल्या सार्यांच्या नजरा
शोभुन दिसे तुला गं गजरा ॥धृ॥
चाँदण्या रातीला
चँद्र हा रंगला
मोगर्याला त्याने
वेनीत माळला ॥१॥
शुंभ्र रंगाला
साजण हो भुलला
मोहात पाडले
त्याने सजणीला ॥२॥
सुंगधित मोगर्याने
श्वास हो फुलला
गंधाने सुखावले
सार्यांच्या अंतरमनाला ॥३॥
प्रितीच्या झर्यात
तोचि बहरला
सुंगंधी होऊनी
चोहीकडे दरवळला ॥४॥
मोगर्याच्या धुंदीने
स्वप्नात तो रंगला
प्रेमाचा नजराणा
गजरा तिला भेटला ॥५॥
