मोबाईल
मोबाईल
1 min
11.4K
विज्ञान तंत्रज्ञानाचे पंख
असे गगनापार झेपावले
अमर्याद ज्ञानयुग आज
मोबाईल मध्ये सामावले
मिळून जाते ओंजळीत
क्षणार्धात माहिती सारी
सातासमुद्रापार भरारी
संपर्काची दुनिया न्यारी
मनोरंजनाचे हे संसाधन
सहज सोपी साठवणूक
ज्ञानाचे परिपूर्ण
घर बसल्या शिकवणूक
आधुनिकतेची जोड देई
उद्योगधंद्यांस योग्य गती
प्रचार प्रसार नि प्रसिध्दी
थांबवे राष्ट्राची अधोगती
अभिव्यक्तीचे व्यासपीठ
कलाविष्कारांचे माध्यम
वेळेचा अपव्यय टाळून
मिटती अज्ञानाचे संभ्रम