STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

4  

Sanjana Kamat

Others

मनःलहरी

मनःलहरी

1 min
145

हृदयाच्या स्पंदनातून,

मनःलहरी झुलवणारे.

रंगहीन आयुष्यात जादू,

मोरपिसी फिरवणारे.


झंझावात आठवणी वादळी,

सुख दुःखात पाझरणारे.

आत्मपरीक्षणाने गैरसमज,

मनःलहरी मिटवणारे.


हसत,रडत मनःलहरी,

जीवनी गुंते सोडवणारे.

साठलेल्या इच्छा पूर्तीस,

स्वप्नाचे धागे गुंफणारे.


उसवलेल्या नात्याची,

वीण घालीत हसणारे.

आप्तस्वकीयांच्या जखमेत,

रक्तबंबाळ लढणारे.


काळोख्या काळरात्रीत,

प्रकाश तेजाळणारे.

कधी सुगंधात दरवळत,

विविध कलेत बहरणारे.


Rate this content
Log in