STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

मंगळवार सुप्रभात भाग्याची..!

मंगळवार सुप्रभात भाग्याची..!

1 min
246

मंगळवार सुप्रभात भाग्याची....!

मंगळाची भीती मला

मंगळवारी ग्रासते

पत्रिकेतल्या मंगळाला

सुद्धा मन माझे पूजते....

कोण म्हणतो पाहून

कडक मंगल राशीला

कोण म्हणतो आहे उच्चीचा

कोण म्हणतो नीचेचा...

इथे सुद्धा उच्च नीच

बेमालूम पणे भय वाढवतो

उगाचच मंगळवारी बाबा

जीव माझा घाबरतो...

आज मात्र वेगळाच मंगळवार

देशासाठी पहा उगवला

खंबीरतेच्या भरवशापायी

जीव माझा सुखाने सावरला....

मंगळवार आजचा मला वाटते

इतिहास नवा पहा घडवणार

लोकशाहीचा जागर जगती

डंका साऱ्या विश्वात घुमवणार...

कडक मंगल भडक मंगळ

उच्च मंगळ नीच मंगळ सारे सारे

बासनात आता जाऊन बसणार

भय मुक्त जीवनाचे आता आंदण मिळणार...

म्हणून म्हणतो सकाळ आजची

मंगळवारची ही आहे मोठ्या भाग्याची

डोळे उघडून पहा जरा

नांदी झाली सकाळी सकाळी सौभाग्याची...!

सुप्रभात....!


Rate this content
Log in