STORYMIRROR

Shreya Shelar

Others

4  

Shreya Shelar

Others

मनाचे मरण

मनाचे मरण

1 min
354

सैरावैरा मनाला 

नेहमी साथ दिली हृदयाने 

पण वेड्या हृदयाची 

कदर नाही केली मनाने 

चूकलेल्या मनाला 

हृदय माफ करत होतं

बावरलेल्या हृदयाला 

मन दोषी ठरवत होतं

मनामधले गुपित 

हृदय होते ओळखत 

हृदयाची भाषा मात्र 

मन नव्हतं समजत 

एके दिवशी हृदय 

अचानक झालं निश्चल 

बेफिकीर मनाला 

तेंव्हा आली भोवळ 

बैचेन ते मन 

तेंव्हा भानावर आलं

अचल हृदयाकडे 

हताश पहात राहीलं

कोणीतरी मग

कुत्रिम श्वास दिला 

निर्जीव हृदय 

लागलं धडकायला 

शरिरापासून अलिप्त

झालेलं ते मन

शांतपणे बघत बसलं

मरणाचा तो क्षण 

हळूहळू एकाकी मनाचे 

त्राण कमी झाले 

भीष्मासारखे अधांतरी 

प्राण त्याने सोडले.


Rate this content
Log in