STORYMIRROR

Anupama TawarRokade

Others

4  

Anupama TawarRokade

Others

मन

मन

1 min
34

मनातल्या सागर लहरी

स्पर्शतात रोज किनारी

अस्तित्वाच्या शोधासाठी पुन्हा

सागरात विरून जाई


मनातला बेभान वारा

सुसाट वाहे भुतलावरी

श्वासातून जाणवत राही

जगण्याची इच्छा सारी


मनातल्या आकाशाला

कशाचेही बंध नाही

क्षितिजाच्या शोधासाठी

नजर भिरभिरत राही


मनातल्या अग्नीची

ज्वाला भडकत राही

शोध घेता स्वतःचा

ज्वलनाची क्रीया होत राही


अग्नी होताच शांत

राखच उरे सारी

मातीत राख मिसळूनही

सुगंध दरवळत राही


मातीतल्या प्रत्येक कणाला

नवा संदर्भ देऊन जाई

अस्तित्वाच्या शोधासाठी पुन्हा

सागरात विरून जाई


साहित्याला गुण द्या
लॉग इन