STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

मन माझे भरून आले

मन माझे भरून आले

1 min
658

मन माझे भरून आले

दाटुन कंठ माझा आला

नयनावाटे तो ओसंडून वाहू लागला

खरच संपेल का हे दुःख आयुष्याचे


डोळे होते ओले माझे

झोप काही लागेना

कारण दुःख होते जीवनी माझ्या

कधी आठवणीत त्या भिजुनी गेल्या


कासावीस जीव हा 

सुखाचा शोध घेत आहे

जखमा ह्या मनावरचा माझ्या

कसला जीवघेणा खेळ चालू आहे


शेवटी सगळे दुःख लपउनि 

जगाला हास्य दाखवायचे आहे

माझ्या डोळ्यातले अश्रू हे

दुःखाचे नाही तर सुखाचे आहे

हे जगाला भासवायचे आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन