मन करा रे प्रसन्न.
मन करा रे प्रसन्न.
1 min
362
मन करा रे प्रसन्न - सारे होऊ सुखासीन,
चांगल्याची आस धरा - मनी रुचे तेच करा,
चला करूया निर्धार - घेऊ सत्याचा आधार,
सारे जण घाम गाळू - दाम कष्टाने मिळवू,
मनी ठेवू नका राग - सारे सरतील भोग,
तन ठेवा हो निर्मळ - वाचा असू दे रसाळ,
पत जाता वरवर - चित्त ठेवा भानावर,
देऊ नका दुजा त्रास - थोडे घाबरा देवास,
मनी जाता अवसान - करू देवाला नमन,
होता प्रभूचे स्तवन - मन होईल प्रसन्न,
मन करारे प्रसन्न - सारे होऊ सुखासीन.