मन हे बावरे
मन हे बावरे
दिवस संपत आला पण माझं मन का बावरे होतं प्रेमाच्या या वाटेवरती का एकदम सुन्न होतं
सगळं कळत असूनही उदास वाटत आहे
खरच मन माझं हे कावराबावरा होतं
माझ्या या भाबड्या मनात प्रश्नांचे धडपड होते
उत्तर काही मिळत नव्हते डोळ्यासमोर प्रश्नचिन्ह उभे होते
प्रेमाच्या ओंजळीत अपेक्षांचे फुल साचले होते
ओंजळीत माझ्या मात्र एक पाकळी सुकली आहे
त्या ओंजळीतल्या पाकळीला आसवांची दाटी आहे
रडत होते ते पण आसव तिचे सुकले आहे
समजून तू घेशील तिला बावऱ्या ह्या मनाला
हळू चुंबन घेशील त्या ओल्या पापणीला
तिला कळते तुझी अवस्था रुतलेल्या त्या मनाची
शब्दाविना कळेल का अर्थ त्या स्पर्शित बंधनाची
शेवटी मन हे मनच असतं कसा आवरू मी
या माझ्या देहाला या माझ्या मनाला