STORYMIRROR

shivani Solanke

Others

4  

shivani Solanke

Others

मला जपून ठेव आई

मला जपून ठेव आई

1 min
12

एक गर्भातील बाळ तिच्या
आईशी जेव्हा संवाद साधते तेव्हा ती म्हणते,

तू मला समजून घेशील ना आई
या समाजापासून वाचवशील ना आई 
मला या जगात यायची भीती वाटते आई
कारण या जगात नराधमाची कमी नाही 
आई मला कोणत्याही अत्याचाराला बळी पडायचे नाही 
मला मान वर करून जगायचं आहे आई
स्वतंत्रपणे फिरायचं आहे आई 
पण भीती वाटते मला माझ्या प्रत्येक पावलांची आई 
कारण मी तुझ्या गर्भात पण सुरक्षित नाही
मला जगायचं आहे आई 
सुरक्षित फिरायचं आहे आई
मुलगी होणं चूक माझी आई 
मला सुरक्षित राहायचं हक्कच नाही 
भीती वाटते जगात यायची आई
तू मला जपून ठेवशील ना आई
आताची स्थिती जरा गंभीर आहे आई,
तू मला तुझ्या कुशीत लपवून ठेवशील ना
आई


              Shivani Sanjay Solanke 


साहित्याला गुण द्या
लॉग इन