मित्रांना पाहू दे गं...
मित्रांना पाहू दे गं...
1 min
229
मला एक दिवसासाठी गावाला जाऊ दे गं
मला माझ्या मित्रांसोबत हसू खेळू दे गं...
जिथे चर्चा होतो माझ्या मैत्रीच्या कहाणीची
तिथे आठवण येतो चेहरा मनाच्या राणीचा
मला माझ्या जिवलग मित्रांना पाहू दे गं...
भर उन्हात मी त्यांच्यासोबत फिरत होतो
दुःख विसरून मी त्यांच्यासोबत हसत होतो
मला परत त्यांच्यासोबत तो वडापाव खाऊ दे गं...
खूप आठवण येते माझ्या पाईपलाईनची
पाण्याच्या टाकीवर बसून पिलेल्या वाईनची
मला मित्रांसोबत पिऊन धिंगाणा घालू दे गं...
ह्या संगमचं अर्ध निघून गेलं आयुष्य
पाईपलाईनविना मी काय कामाचा मनुष्य
माझी शेवटची ईच्छा मित्रासमोर मरू दे गं...
