मित्रांना पाहू दे गं....
मित्रांना पाहू दे गं....
1 min
380
मला एक दिवसासाठी गावाला जाऊ दे गं
मला माझ्या मित्रा सोबत हसु खेळू दे गं.....
जिथे चर्चा होतो माझ्या मैत्रीच्या कहाणीचा
तिथे आठवण येतो चेहरा मनाच्या राणीचा
मला माझ्या जिवलग मित्रांना पाहू दे गं....
भर उन्हात मी त्यांच्या सोबत फिरत होतो
दुख विसरून मी त्यांच्या सोबत हसत होतो
मला परत त्यांच्यासोबत तो वडापाव खाऊ दे गं...
खूप आठवण येते माझ्या पाईप लाईनची
पाण्याच्या टाकीवर बसून पीलेल्या वाईनची
मला मित्रानं सोबत पिऊन धिंगाणा घालू दे गं....
हया संगमच अर्ध निघून गेल आयुष्य
पाईप लाईन वीणा मी काय कामाचा मनुष्य
माझी शेवटची ईच्छा मित्रसमोर मरू दे गं.....
