STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Others

4  

Sangam Pipe Line Wala

Others

मित्रांना भेटवं

मित्रांना भेटवं

1 min
225

देवा माझ्या डोक्यावरच तू ओझं हटव

मला माझ्या बालपणीच्या मित्रांना भेटव...


अहो कसं विसरू मी माझ्या मित्रांना 

मनावर सुंदर कोरलेल्या त्या चित्रांना 

माझ्या डोळ्यात जे येतं पाणी ते तू मिटव....


आठवण येतं आहेत ते कॉलेजचे दिवस 

मित्रांनी किती केले एकमेकासाठी नवस 

आतुर आहे मी मला ना तू आशेवर लटकव.....


आमचं ते रोज गळ्याला लागून भेटणं 

रोज रात्री जमून चांगलीच महेफील लुटणं 

मला माझ्या त्या मित्रांच्या मैत्रीत अटकव.....


अरे संगम आणखी किती पैसे कमावशील 

पैशासाठी तू किती आपले मित्र गमावशील

देवा तुला हात जोडतो मला ना तू भटकव.....


Rate this content
Log in