मित्रा
मित्रा
1 min
423
मित्रा तुझ्या असण्याने
मला मैत्रीचे सूत्र कळले
सुख पकडून आलेले हात
दुःखात मात्र गळले..!!
पण ठीक आहे
दुनियेची हीच रीत आहे
अपवाद कोणी नाही
म्हण हीच प्रचलित आहे..!!
नाही म्हणायला
चांगली उदाहरणंही आहेत
पण सुदाम्याची पुरचुंडी खोलणारा
तो श्रीकृष्ण कुठे आहे..!!
कर्ण दुर्योधनचेसुद्धा
लोक गुणगाण गात असतात
स्वार्थ निःस्वार्थ दोन पारडी
न जाणे कोणाला मत देतात..!!
नाही मी पुराण सांगत नाही
आणि नकारघंटाही वाजवत नाही
पण पुस्तकात वाचलेलं
वास्तवात कुठे दिसत नाही..!!
