मी उत्तर देऊ शकणार नाही
मी उत्तर देऊ शकणार नाही
1 min
312
मी उत्तर देऊ शकणार नाही
पण सगळं कळतंय मला
जाणीव खऱ्या-खोट्याची
उगाच छळतेय मला
मन कुणाचे दुखावून
जिंकायचे नाही मला
उत्तर देऊन वादाला उगाच
वाचा फोडायची नाही मला
तू मोठा मी लहान
मान्य असेल मला
वादाच्या भोवऱ्यात
मीच हरवेल मला
कुठे वादात जिंकून
पदकं हवी आहेत मला
तुझ्या मनाच्या कोपऱ्यात
छोटीशी जागा पण पुरेशी मला
उगाच उत्तर देऊन
जिंकण्यापेक्षा स्वतःला
आयुष्यभर हरून मी
जिंकेल तुझ्या ह्रदयाला
