Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Leena Yeola Deshmukh

Others

3  

Leena Yeola Deshmukh

Others

मी तुमचा विठूमाऊली

मी तुमचा विठूमाऊली

1 min
222


इंद्रायणी काठी चंद्रभागेच्या तिरी आहे माझे स्थान

माझ्या नामाच्या गजरात वारकरी होती लीन...


आषाढी एकादशी ला दर्शन घेण्यास यायचे तुम्ही पंढरी

डोईवर तुळस अन् उंच पताका असे तुमच्या खांद्यावरी..


तहान भूक, ऊन वारा विसरून भेटाया यायचे वारकरी

म्हणायचे उभा तो विठू माझा सावळा एक त्या विटेवरी...


ज्ञानेश्वर माऊली देखील भेटीस माझ्या आले होते

एक भावमनाने तुकोबाचे अभंग सारे पांढरी गाते...


भाळी चंदनाची कोर गळ्यात तुळशीच्या माळा

माझे हे रूप बघण्यासाठी भक्तांना लागतो लळा..


हार फुले तुळशीचे पाने यांमुळे पालखी छान सजायची

माझ्या पंढरीत मीच हरवायचो जेव्हा टाळ मृदंग वाजायची..


माझ्या भेटीसाठी जीव तुमचा आतुरतो

दर्शनाशिवाय माझ्या पूर तुमच्या लोचनी येतो...


जशी तुमच्या मनी आस माझ्या दर्शनाची 

तशी माझ्याही मनी हाक येते तुम्हा लेकरांची...


 मी तुमचा विठू माऊली करतो एक नम्र विनंती

माझ्या नामाचा गजर करा कुटुंबासमवेत घरात बैसुनी..


मनाने करा वारी माझी भक्तीत क्रांती जागवूनी

आरोग्य तुमचे सांभाळा कोरोनाला हरवूनी..


पोलिस, डॉक्टर, कामगार यांच्या रुपात करतो मी कार्य

कोरोना मुक्त होण्यासाठी शासनाला तुम्ही करावे सहकार्य..


तुमचे सहकार्य हीच माझ्यासाठी तुळस मंजिरी

म्हणूनच, तुम्ही सर्व आहात माझे लाडके वारकरी...


Rate this content
Log in