Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shreyas Gawde

Others

3  

Shreyas Gawde

Others

मी 'सुई' बोलतेय...

मी 'सुई' बोलतेय...

1 min
1.6K


मी एक 'सुई' बोलतेय...

मी टचकन टोचते, तसे डोळ्यात पाणी येते...

म्हणून काहींना बोचरी, तर काहींना टोचरी वाटते...

पण, ते हे विसरतात की त्या दु:खातही क्षणातच मी ओठी 'आई'ची आठवण आणून देते...


सत्यावर चालणारी म्हणून कदाचित काहींना माझी भीती असते...

कधी सलाईनच्या बॉटलमधून, तर कधी तडकाफडकी वेध घेते मी सगळ्या अंदाजाचा...

एकदा स्थिरावल्यावर मात्र मी माझ्या ग्लुकोजमधून सखोल पुरावा देते अस्तित्वाचा...

काढता काढता मात्र डोळे घट्ट मिटून पुन्हा एकदा ओठी आईची आठवण आणून देते नक्की...


खरं सांगते मी एक मार्ग आहे तुमच्यातल्या आनंदी खुश आयुष्याचा...

खरं सांगते मी एक धागा आहे तुमच्या जगण्यातील मार्गाचा...

कुपोषितांना मी उठवते; तर कितीही बहदूरपणाचा आव आणणाऱ्यांना मी रडवते...

परत एकदा खरं सांगते मी वेध आहे कटू, रोख-ठोक, प्रामाणिक सत्याचा...


माझा गैरवापर करणाऱ्यांचा माझी न्यायमूर्ती नायनाट करते...

म्हणूच नेहमी मी सत्याची कास धरते...

माझा चांगला वापर करणाऱ्यांचा मी नेहमी सहारा होते फक्त त्यांच्या सुखी आयुष्यासाठी...

आयुष्याची कास माझ्या भरवशावर आहे पक्की...


मी 'सुई' बोलतेय...

खरं बोलते आणि फक्त थोडीशीच टचकन टोचते...

सदैव तुमच्या भल्यासाठीच झगडतेय...

मी 'सुई' बोलतेय...


Rate this content
Log in