STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Others

3  

Sangam Pipe Line Wala

Others

मी कविता तूझी आहे

मी कविता तूझी आहे

1 min
373

मी शब्दांची गाथा तूझी आहे 

तू जी लिहतो मी कविता तूझी आहे....


मला ही दुनिया मोहुन गेली 

माझी सारी आशा राहून गेली 

दुःख शब्दात गाता मी तूझी आहे.....


हे जग सारं मला करे तंग 

आकाशात उडेना सुखाची पतंग 

हळव्या भावनांची माता मी तूझी आहे....


मला का वाटे दुनियेची भीती 

कळली ना कधी ही नाती गोती 

जगण्याची आस आता मी तूझी आहे....


संगमवर का जगण्याची सक्ती 

येइल सुख हाती मिळेल मुक्ती 

विचार कर जन्म साता मी तूझी आहे....



साहित्याला गुण द्या
लॉग इन