STORYMIRROR

SWATI WAKTE

Others

3  

SWATI WAKTE

Others

म्हणीची दुनिया

म्हणीची दुनिया

1 min
211

म्हणीची ही दुनिया सार्थ

जाणू या आपण त्याचा अर्थ

कराल तसे भराल

ह्याच जन्मात फेडाल

पेराल तेच उगवेल

फळ सर्व गोष्टीचे मिळेल

इच्छा तिथे मार्ग

मनात आणले तर मिळेल स्वर्ग

अतिशहाणा त्याचा बैल रिकामा

मीपणा सोडून लागा कामा

अति तिथे माती

हावाची वाटावी भिती

आधी पोटोबा मग विठोबा

पोटा पाण्याचा प्रश्न आधी मिटवा बाबा

दुनियेत ह्या म्हणीच्या

शोधू मंत्र माणुसकीचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन