STORYMIRROR

विजयकुमार देशपांडे

Others

4  

विजयकुमार देशपांडे

Others

महिला दिनानिमित्त

महिला दिनानिमित्त

1 min
438

केवळ हक्क गाजवण्यापुरती

माझी कर्तव्यदक्ष "बायको" गृहित धरून

आयुष्यात दोन कौतुकाचे शब्द

बोलणे झाले नाहीत तुला माझ्याकडून


मी आयुष्यात एखादा तुझा हट्टही

वेळेवर कधी आजवर नाही पुरवला

मी साधा चहाचा कपही आपुलकीने

तुला कधी नाही विचारला


तू अंथरुणावर पडून आजारी असतानाही

हातात हात धरून मी पाहिला नाही

आपणहून हौस मौज करण्यातही

कधीच पुढाकार मी घेतला नाही


मी तुला नेहमीच "दुय्यम/कमी" लेखण्यात

"स्वत:ला मोठ्ठा" समजत आलो

मी जमेल तेव्हा घालूनपाडून बोलण्यात

आपल्याच आनंदात रममाण होत आलो


एवढं सगळं सहन करूनही

"संसार आपल्या दोघांचा" समजून

निमूटपणे हे सगळे सहन करू शकणाऱ्या तुला -


त्या "मी --मला --माझे " इतकेच विश्व समजणाऱ्या,

"उशीरा डोळे उघडलेल्या"

या तुझ्या नवऱ्याकडून -


उद्याच्या खास "तुझ्या दिना"निमित्त

लाख लाख शुभेच्छा !


Rate this content
Log in