महागडे शिक्षण
महागडे शिक्षण
1 min
306
शिकणं झालंय महाग
काही सोपी गोष्ट नाही
पैसा असल्याशिवाय
शिक्षण पूर्ण होत नाही
पहिल्या वर्गात प्रवेश
घेण्यासाठी पहा रांग
पैसे जवळ असतील
तरच ठेवता येथे टांग
श्रीमंतांच्या पोरासाठी
मोठ्या शाळा उघडायचं
गरीब बापाच्या पोरांनी
सरकारी शाळेत शिकायचं
सर्वांसाठी मोफत शिक्षण
इथे नावालाच असते
उच्च शिक्षण घेण्यासाठी
गरिबांकडे पैसा कुठं असते
आजचं शिक्षण पूर्णपणे
पैशाने आहे भरलेले
पैसा नसेल जवळ तर
शिक्षण असते उरलेले
शिक्षणातील पैशाचा खेळ
लगेच संपवायला हवे
गरीब घरातच राहतील
जग होईल श्रीमंतांच्या नावे
