STORYMIRROR

Vijay Sanap

Others

4  

Vijay Sanap

Others

मेघ पावसाळी

मेघ पावसाळी

1 min
255

मेघ पावसाळी असे

नाचे गगना वरती

वाट तुझीच पहाते

भान हरुन धरती ।।


बळी दादा सुखावला

मेघ आभाळी पाहून

हात जोडीतो नभाला

डोळे आकाशी लाऊन ।।


मेघ पावसाळी येता

पडे मिरगाची छाया

उभ्या सालात राबून

बळी झिजवितो काया ।।


माय काळी तहानली

पोट गेले खपाटीला

आता कर बापा दया

दान माझ्या दे ओटीला ।।


अख्या जगाचा पोशिंदा

काळ्या रानात राबतो

आस बांधून पोटाला

उभं आयुष्य जगतो ।।


ओल्या मातीत चालते

माझी तिफण डौलानं

चाड्यावर धरी मुठ

राणी पेरती तोलानं ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन