मेघ गर्जना
मेघ गर्जना
1 min
627
कडकडाट करत बरसे धारा
मेघ गर्जना करत आला॥धृ॥
ऊन-सावलीचा खेळ चालला
थंड थंड गार वारा
नभ हा दाटुनी आला
मोर फुलवी मोरपिसारा॥१॥
वातावरणात बदल झाला
सुंदर दिसे निसर्ग सारा
उत्साह येई मनाला
अंगणात नाचायाला॥२॥
पाखरं शोधती हो निवारा
क्षणार्धात बदल झाला
मऊ मऊ सुंदर घरट्याला
ऊब येई पाखराच्या पिल्ला॥३॥
मातीचा सुगंध दरवळला
ओलावा येई अंकुराला
चोहीकडे दिसे रम्य नजारा
सौंदर्याने परिसर नटलेला॥४॥
