STORYMIRROR

Anil Chandak

Others

3  

Anil Chandak

Others

मौल्यवान आहे वेळ

मौल्यवान आहे वेळ

1 min
240


विषय- मौल्यवान आहे वेळ


काळाची,सावली प्रत्येकांवरी,

कोणी नाही सुटले त्यातूनी!

मौल्यवान ,आहे वेळ आपला,

जाणवतो, प्रत्येक क्षणाक्षणांतूनी!!1


हासत ,खेळत जाते आयुष्य,

फरक फक्त एका क्षणाचा !

क्षणापुर्वी इथे जीवन असते,

क्षणात , घोळ मरणाचा !!2


किती, एक आले इथे,

काळाच्या,पडद्याआड गेली!

राजे,महाराजे,गरीब,श्रीमंत,

धरेवरी,कोणी नाही थांबली!!3


बालपण,तारूण्य,वार्धक्य,

अवस्था,असते प्रत्येकाची !

शाश्वत ,नाही इथे काही,

साधने,किती ही असली उपभोगाची!!4


गाडी चुकलेल्या विचारा,

एका मिनीटाची किंमत !

शर्यत हारलेला खेळाडु,

सांगेल,एका सेकंदाची किंमत!!5


आयुष्याची,पाने उलटता,

कळत नाही,कसे ते सरते !

मागे हातपाय मारून काय उपयोग,

हाती फक्त,पश्चाताप उरते !!6



Rate this content
Log in