मैत्रीची उब
मैत्रीची उब
काही सुंदर क्षण येतात अन्
आठवणी ओथंबून वाहतात
सोनेरी क्षण येतात सजून
सुगीचे दिन येतात जीवनात
मैत्रीने आयुष्य जाते बदलून
सुखदुःखाची झालर पांघरत
बालपणाचे खट्याळ क्षण
गप्पा गोष्टी जातात रंगत
शाळेच्या आठवणींना येते उधाण
जीवनात मैत्रीला निराळे स्थान
मैत्रीला असते विश्र्वासाची झालर
आणि असते आठवणींची उब
असते भेटण्याची आतूरता आणि
जगण्यास मिळते नवीन उर्जा
या सुवर्ण क्षणांसाठी
मैत्रीची गरज भासते