मैत्रीची आठवण...
मैत्रीची आठवण...

1 min

13.1K
आठवणींच्या गावी जाता
शाळा नि प्रिय मैत्री गवसते
बिनसलेल्या खेळातही मन
आज नकळत रमवून टाकते...
वाढदिवसाचे एक अधिक
चॉकलेट राखून ठेवायचे
एका खास मित्र-मैत्रिणीचे
किती ते कौतुक असायचे...
मुद्दामहून केलेली खोडी
गंमत होती चिडवण्यातील
कायमचा आनंद पेरणारी
मैत्री असायची शाळेतील...