मैत्रीचा प्रवास
मैत्रीचा प्रवास
1 min
214
तुझ्या माझ्या मैत्रीची
सुरुवात झाली वळणावर
रस्ते एकत्र झाले दोघांचे
ओसाड त्या माळरानावर
सहवासाचा प्रवास झाला
अलगद पडणार-या गारांचा
मन ओथंबून वाहू लागले
जसा वर्षाव पावसाच्या सरींचा
जसे शून्यातून निर्मित विश्व
ओळख करून देई जगाची
तुझ्या सोबतीने सुरुवात होई
आयुष्याच्या सुखकर प्रवासाची
तुझ्या रूपाने घडले दर्शन
साक्षात त्या परमेश्वराचे
आभार कसे मानू मी
त्या परमपित्या विधात्याचे
या मैत्रीच्या प्रवासाला
नजर न लागो कुणाची
अशीच साथ राहो आपली
ही मैत्री एक प्रवासाची
