मैत्री
मैत्री
मैत्री मुळे यतो आयुष्यात खरा अर्थ.
तोच ध्यास, प्रेम, विश्वास,देत समर्थ.
मैत्री ही रेशीम, मखमली धागाचे सूत.
मन मोकळे करत, मायेची भूक होते सुप्त.
मैत्री राधास बावरी करणारी धून.
भेटताच विसरे देहभान,भूक तहान.
मैत्रीची साथ सुख दुःखात आईवडीलांसारखीे.
कुरूक्षेत्री अर्जुनाला, मार्गदर्शक कृष्णाच्या गीते सारखी.
मैत्री आयुष्यातील संघर्षावर मलम लावणारी.
सुखाचा सरीत भिजून चिंब न्हात ठेवणारी.
मैत्री मुळे चमकते गगनातील असंख्य तारे.
काळजातल्या काळजातून थेट बहार फुलविणारे.
मैत्री हवे हवेसे वाटणारे प्रेमाचे वरदान.
ज्याला भेटते तो खरा धनवान अन् पुण्यवान.
भेटल्यावर ते टिकवने ज्याला मनापासून जमते,
त्याच्याच आयुष्यात खरी ही गुरू किल्ली फळते.
मैत्री आयुष्यात अचानक भेटलेल्या मैत्रिणीची.
क्षणभर जग विसरून, आनंदाने गळेभेटीची.
कलीयुगी मैत्री नशिबाचा खेळ, भाग्य उजळणारी,
कधी व्यसनाच्या आहारी आयुष्यातून उठवणारी
