STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

4  

Sanjana Kamat

Others

मैत्री

मैत्री

1 min
23.8K

गंध मैत्रीचा,आयुष्यात देत खरा अर्थ.

तोच ध्यास, प्रेम,विश्वास, खरे समर्थ.

मैत्री रेशीम, मखमली धागाचे सूत.

मन मोकळे, मायेची भूक करे सुप्त.


गंध मैत्रीचा राधास बावरी करे धून.

भेटताच विसरे देहभान,भूक तहान.

सुख दुःखात आईवडीलांसारखीे.

अर्जुनाला, मार्गदर्शक गीते सारखी.


मैत्री आयुष्य संघर्षी मलम लावणारी.

सुखाचा सरीत चिंब न्हात ठेवणारी.

मैत्री चमकवे गगनातील असंख्य तारे.

काळजातून थेट बहार फुलविणारे.


मैत्री हवेसे वाटणारे प्रेमाचे वरदान.

भेटे ज्यास तो खरा भाग्यवान.

भेटल्यावर टिकवने ज्याला जमते,

त्यालाच ती गुरू किल्ली फळते.


मैत्री अचानक भेटलेल्या मैत्रिणीची.

जग विसरून, आनंदाने गळेभेटीची

कलीयुगी ती नशिब पारखणारी,

कधी व्यसना आहारात संपवणारी


Rate this content
Log in