मैत्री
मैत्री
1 min
12
मैत्री कृष्ण सखा सम
नाही उच्च निच भाव
प्रेम जिव्हाळा निर्मळ
खेळ प्राक्तन स्वभाव
गाठ रेशीम विश्वास
मखमली शोभे सूत
मैत्री संघर्षी मलम
भूक मायेची ती सुप्त
भेटे सुगंधी बहार
चिंब सुखाचा सरीत
हळूवार डोकावत
आठवणी शिदोरीत
मनी वसंत फुलला
अर्थ येई आयुष्यात
षढरिपु संहारत
सवंगडी सानिध्यात
कलयुगी मैत्री असे
नशिबाचा खेळ डाव
कधी व्यसनी प्रहार
माती मोल देई घाव
