मैत्री......
मैत्री......
मैत्री फुलासम निरागस हवी
दरवळ घुमे जगी नीत नवी
डावपेच शंका नकोच मानसी
मैत्रीचा हातच द्यावा जनासी
गरीब-श्रीमंत नको भेदाभेद
मैत्रीचा निखळ श्वास सांगे वेद
श्रीकृष्ण-सुदामा मैत्रीचे आदर्श
डोळ्यांत सजला मैत्रीचाच हर्ष
सुख-दु:ख भाव मित्रा व्यक्त करी
प्रकाश मैत्रीचा. साचे दाट उरी
मित्रांच्या साथीने दुःखात हसले
मैत्रीच्या शिवाय जगच कसले?
आडवेळी कामी येती मित्र सारे
आवरती माझ्या मनाचे पसारे
मैत्रभाव खराआजन्म जपूनी
निर्भेळ मैत्रीची साथ ही अर्पूनी
सुखद वारस मैत्रीचा लाभला
दुःखाचीया क्षणी मित्रच जागला
