माय
माय
1 min
104
पुस्तकात भेटे माझी माय
मुलींच्या शिक्षणाचा घातलाय घाट
शेणगोळे शिव्या सोसला त्रास
मुलींच्या शिक्षणाचा घेतला ध्यास
चूल व मूल हेच मुलींचे विश्व
दिले पटवून शिक्षणाचे महत्त्व
एक बाई शिकली तर कुटुंब शिकते
खरं आहे हे आज मला पटले
आदर्श शिक्षकांचा मिळे मान
मदतीला आल्या फातिमा शेख
शतदा नमन करिते मी माय
तुझ्यामुळे स्त्री आज सुखी हाय
