STORYMIRROR

Deepali Mathane

Others

3  

Deepali Mathane

Others

माय मराठी

माय मराठी

1 min
202

माय मराठीचा नाद

जसा अमृतघट वर्षतो

तृप्त होऊनिया मनी

जीव आनंदाने हर्षतो


   राज्यभाषेचा गुलदस्ता

    शब्दगंधातुनी बहरतो

    मायमराठीचा बाणा

   व्याकरणातुनी मोहरतो


श्लोक ओव्या अभंगातुनी संतांच्या

राजभाषेचा गोडवा विहरतो

गवळण, पोवाडे, भारुडातुनी

प्रबोधनाचा वेलू बहरतो


   मायबोली साहित्याचा झरा

   शब्दा-शब्दातुनी वाहतो

   आमच्या सारखे नशिबवान आम्हीच

   जे नऊ रसात तृप्त नाहतो


काना-मात्रा, वेलांटी, अनुस्वार

आकारा -उकारात सजतो

समृद्धभाषेचा मान

माझ्या मराठीस लाभतो


   कथा-कादंबऱ्या, कविता, गझल

   राजभाषेची विविध रूपे सजवितो

   प्रत्येकाच्या मना-मनात

   भाषेचा अभिमान जागवितो


माझ्या मायबोलीचा गंध

शब्दसुमनांतुनी दरवळतो

अव्यक्त भावनेतील भाव

मग लेखणीतूनही सळसळतो


Rate this content
Log in