माय मराठी
माय मराठी
1 min
460
देशाचा अभिमान माझ्या
महाराष्ट्राची शान आहे
लाभले भाग्य आम्हास
आम्ही बोलतो मराठी आहे
जगप्रसिद्ध महामानव जिने
इथे घडवले
परप्रांतीय साहित्यिकांना ही जिने
इथे बोलाविले
चांगल्या चांगल्या भाषेला ही जिने
इथेच नमविले
केला ज्याने तीचा घात त्याची
इथेच जिरवले
कौतुक करावे जितके तिचे
तितके शब्द अपुरे पडावे
अशी आमची भाषा मराठी
जिला आम्ही मानतो आमुची
सर्वांची लाडकी माय मराठी..
