माऊली
माऊली
1 min
104
माझी माउली
प्रेमाची सावली
माझी माउली
जीवनाचा सार
सर्वांचा आधार
माझी माउली
जीवनाला दिला आकार
स्वप्नं झाले साकार
माझी माउली
आशेचा किरण
ममत्वाचे भरण
माझी माउली
दिव्यत्वाची प्रचिती
ज्ञानाची अनुभूती
माझी माउली
गुण किती गावे
काय काय सांगावे
महात्मा म्हणावे
माझी माउली!
