STORYMIRROR

purushottam hingankar

Others

2  

purushottam hingankar

Others

माऊली प्रस्थान

माऊली प्रस्थान

1 min
71

प्रस्थान करुनी पंढरीशी जाता

प्रेम प्रसावता आजोबांशी!!१!!


ज्ञानि्यांचा राजा विसावला गृही

आळंदित राही आजोबांच्या!!२!!


सकाळी उठोनी ब्रम्ह मुहूर्तात

वैष्णवा सहित मार्गी लागे!!३!!


वैष्णव डिंगर काकडा करती

ज्योत ओवाळीती पांडुरंगा!!४!!


संतदास म्हणे सर्व वारकरी

ज्ञानोबा संगती पायी जाती!!५!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन