माउली तुम्ही...
माउली तुम्ही...
माउली
एवढे सोपे नाही
समाजाच्या हृदय हृदयात
आणि
जगाच्या मनामनात
असे अधिष्ठित होणे...
असे दुमदुमत नाही
कोणाचेही नाव
भजन - कीर्तनात
आणि
असे कोणी घेत नाही
कोणाचाही नाव
वाजवून टाळ - मृदंग...
माउली
जगाला दाखवले तुम्ही on in
शक्ती
आणि भक्तीतला फरक
आणि पटवून दिले
चांगदेवाला ही
सोपे नसले तरी
एव्हढे कठिण ही नसते
जिवंत वाघाला हातळणे
आणि हे ही पटवून दिले
काहीच अवघड नाही
भक्तीच्या जोरावर
निर्जीव भिंतीला चालवणे...
माउली
गर्विष्ठ पंडितांना
पटवून दिले तुम्ही
सोपे असते वेदांना
मुखोद्गत करणे
पण एव्हढे सोपे नाही
जीव मात्रांचा वेदना
समजून घेणे...
या उपरोक्त सत्याला
सिद्धही केले तुम्ही
रेड्याच्या मुखी वदवून वेद,
आणि जगाला देऊन प्रार्थना
पसायदानाचा रूपात... ।
