STORYMIRROR

काव्य चकोर

Others

3  

काव्य चकोर

Others

माणूस

माणूस

1 min
811

II माणूस II


कोण म्हणतो प्रगती

तर कोण म्हणतो अधोगती..

जीवनाच्या रहाट गाड्यात

माणूस देतो स्वतःस गती..!!


दिवासाची काय बात हो

आता जागून काढतो राती..

स्वःहित जपता जपता

नष्ट करतो इतर जाती..!!


भरता तुंबडी स्वतःची

तो अवनीस करतोय रिती..

झुकवून डोंगर माथे

त्याने उपसली सारी माती..!!


नष्ट करून वनराई 

उभारल्या सिमेंटच्या भिंती..

अरे माणसा तुझ्या हौसेचे

मोल तरी आहे किती..!!


झाले परागंदा वन्य प्राणी

लुप्त झाल्या किती जाती..

माणूस नावाच्या श्वापादास..

ना उरली आता कसलीच भीती..!!


Rate this content
Log in