माणूस समजून घेताना
माणूस समजून घेताना
माणूस समजून घेताना
जोडावीत मने अंतःकरणी
हळुवार जपाव्यात भावना
नात्यात नकोच उणीदुणी...१
माणूस समजून घेताना
ठेवावं लागतं मन मोठं
झाल्या चुका पोटात घालून
करावं अंतःकरण मोठं...२
माणूस समजून घेताना
नका करू सरबदणी
तोंडावर देवून समज
नकोच गैरसमज मनी...३
माणूस समजून घेताना
करावा आदर मनातून
माणसापेक्षा माणूसकी भली
दाखवावे आपल्या वर्तनातून...४
माणूस समजून घेताना
जुळावीत विचारांची मुळे..
जातीपेक्षा माणूसच श्रेष्ठ
कशाला विचारता कुळे....५
माणूस समजून घेताना
करावी विचारांची पेरणी
करून मदत गरीबास
लीन व्हावे आईचरणी...६
माणूस समजून घेताना
माणसात पहावा देव
करून लोकांस अन्नदान
माणुसकीला फुटेल पेव...७
माणूस समजून घेताना
उघड रे मनाची दरवाजे
इतरांचेही हीत पहाणा-यांस
माणूसकीचा ताज साजे...८
माणूस समजून घेताना
माणसाने माणसाला मानावे
घेवूनी मानवरूपी जीवन
स्वतःस जगी धन्य पावावे...९
माणूस समजून घेताना
मनात असावा भाव
माणसात पहावा देव
हाच खरा साक्षीभाव....१०
