माणुसकीचा झरा
माणुसकीचा झरा
1 min
233
माणुसकीचा झरा
वाहतो सगळीकडे
साक्षात परमेश्वर
वसती सगळीकडे ||१||
माणसात शोधता
देव भेटला मजला
त्याच्या सानिध्यात
देव मजला कळला ||२||
मदतीचा हात दिला
आधार एकमेकाला
म्हणूनच सांगतो मी
शोधा हो माणूसकीला ||३||
द्यावे तेवढे मिळेल
असो कोणतेही क्षेत्र
कमी पडतील हे क्षण
जेव्हा सोबती हे मित्र ||४||
